जिल्ह्यामध्ये कृषि यंत्राचा वापर तसेच ग्रामीण युवकांना कृषिअवजारे हाताळण्याचे व व्यवस्थापन करण्याचे कौशल्य अवगत होणे करिता कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे ग्रामीण युवकांना कौशल्यआधारित प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत कृषि अवजारे देखभाल व दुरुस्ती या विषयांवर दी. 24/3/2022 ते 28/3/2022 दरम्यान ट्रॅक्टर चालकांसाठी पाच दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणादरम्यान प्रा.स्नेहा वेलादी, विष्यतज्ञ कृषिअभयांत्रिकीयांनी कृषि कृषिअवजारांची माहिती व वापर याविषयी मार्गद्शन केले. तसेच श्री. हर्शिद रामटेके आय टी आय इंस्त्रॅक्टर यांनी ट्रॅक्टर विषयी सखोल मार्ग दर्शन केले. त्यासोबतच प्रशिक्षणार्थींना स्वयंचलित धान रोवणी यंत्र, धान पेरणी यंत्र व स्वयंचलित धान कापणी यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण श्री. अरविंद बोरकर व श्री.रुपेश उईके यांनी दिले.प्रशिक्षणा दरम्यान सिंदेवाही, नाग भिड व सावली तालुक्यातील ट्रॅक्ट र चालक उपस्थित होते. प्रशिक्षणाचे समारोप मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब बऱ्हा टे व कार्यक्रम समन्वयक डॉ विनोद नागदेवते यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. दरम्यान तालुका कृषि अधिकारी श्री अनिल महाले, विषय तज्ञ डॉ सोनाली लोखंडे, विषय तज्ञ डॉ विजय सिडाम व विषय तज्ञ डॉ गणेश काळू से उपस्थित होते.प्रा. स्नेहा वेलादी यांनी प्रशिक्षण समन्वयक म्हणून प्रशिक्षण राबविले तर कार्यक्रम समन्वयक डॉ विनोद नागदेव ते यांच्या मार्गर्शनाखाली सदर प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी भात पैदास कार श्री. गणविर श्री. कैलास कामडी, श्री. अजय नेवारे यांचे सहकार्य लाभले.