प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे प्रक्रिया उद्योग व उद्योजकता प्रशिक्षण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादनामध्ये धान व धान आधारित पोहा मुरमुरे इत्यादी मूल्यवर्धित पदार्थ याची निवड चंद्रपूर जिल्हा करता करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थी उद्योजकांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 28 ते 30 मार्च 2022 या कालावधीत कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे संपन्न झाले या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्याचे जिल्हा नोडल अधिकारी माननीय श्री भाऊसाहेब बराटे यांनी उद्घाटन प्रसंगी या योजनेचे महत्त्व गरज अनुदान तपशील उद्दिष्टे यावर भर दिला तसेच योजनेअंतर्गत उद्योजक कांचे क्षमता बांधणी करून शेतमाल प्रक्रियेस चालना द्यावी असे सांगितले प्रशिक्षणामध्ये डॉ व्हि जी नागदेवते कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद् यांनी कृषी विज्ञान केंद्राचा सहभाग कार्य शेतमालाला मूल्यवर्धित कौशल्य विक्री व्यवस्थापन यास मोठा वाव असल्याचे नमूद केले डॉ सोनाली लोखंडे विषय विषय तज्ञ उद्यान विद्या व जिल्हास्तरीय प्रशिक्षक यांनी धान भाजीपाला व फळ प्रक्रिया व त्याकरता लागणारी यंत्रसामुग्री तसेच उद्योजकता विकासाकरिता लागणाऱ्या मुलभूत कौशल्य विकास या बाबींवर विशेष मार्गदर्शन केले सदर प्रशिक्षणाकरिता सौ नीलिमा पाटील विषय विषय तज्ञ गृह विज्ञान कृषी विज्ञान केंद्र सोनापुर गडचिरोली यांनी धान मूल्यवर्धन राइस ब्रान ऑइल याकरिता लागणाऱ्या यंत्र यावर सखोल मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षणार्थी करता अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले व धान तसेच पोहा मुरमुरा मिल येथे भेट देण्यात आल्या तसेच श्री गौतम कांबळे डी आर पी चंद्रपूर यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट अन्नसुरक्षा मानांकने यावर विस्तृत असे मार्गदर्शन केले प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमांमध्ये डॉरवींद्र मनो हरे उपसंचालक कृषी विभाग चंद्रपूर यांनी महिला व युवक उद्योजक निर्माण व्हावे असे सांगितले तसेच एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थींनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आव्हान केले व काही अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा असे सांगितले तसेच जिल्हा प्रशिक्षक तज्ञ डॉक्टर लोखंडे यांनी ब्रांड इंग व पॅकेजिंग ही काळाची गरज असल्याचे सांगितले प्रशिक्षणाच्या यशस्वितेकरिता इंजिनिअर स्नेहा वेलादी विषय विशेषज्ञ कृषी अभियांत्रिकी व डॉ. व्हि एन सिडाम विषय विषय तज्ञ कृषी विस्तार कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांचे मोलाचे सहकार्य लाभले याप्रसंगी सर्व लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले