दि.16/07/2022 रोजी कृषि विज्ञान केंद्र सिंधेवाही जि. चंद्रपूर येथे “भारतीय कृषि अनुसंधान परिषद ” स्थापना दिवस साजरा करण्यात आला . या वर्षीचा 94वा ” भारतीय कृषि अनुसंधान परिषद “स्थापना दिनाचे आभासी पद्धतीने माननिय श्री नरेंद्र सिंह तोमार ,कृषि मंत्री ,भारत सरकार यांच्या हस्ते साजरा करण्यात आला . डॉ. ए . के सिंह DDG -ICAR यांनी प्रास्ताविक केले .त्यामध्ये 2014-2022 या कालावधी मध्ये 1600 पेक्षा जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांची निर्मिती करण्यात आली .
डॉ. त्रिलोचन महोपत्रा डी .जी (ICAR) यांनी ICAR अंतर्गत विविध संस्थानी केलेल्या कार्यावर उजाळा दिला .
अझादी का अमृत महोत्सव निमित्त मान्यवरांच्या हस्ते 75000 प्रागतसिल शेतकऱ्याची यशोगाथा प्रकाशित करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉ . व्हि.जी नागदेव सर वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही होते.प्रमुख उपस्थिती मध्ये प्रगतिशील शेतकरी श्री हेमंत शेद्ररे, श्री चहांदे होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ . विजय .न.सिडाम शास्त्रज्ञ यांनी भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली , संस्था चे भारतीय कृषि विकासामध्ये या संस्थेच्या मोलाच्या योगदानवर उजाळा दिला .
ICAR चे उद्दीष्टे:-
(१) शास्वत शेतीसाठी संशोधन आणि तंत्रद्यान विकास योजना , उपक्रम , दर्जेदार मानव संसाधन विकास सक्षम करण्यासाठी कृषी शिक्षणाला मदत देणे आणि समन्वय साधने .
(२) कृषि आधारित ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर , अवलंब,द्यान व्यवस्थापन आणि शमता विकासासाठी फ्रंतलाईन विस्तार आणि कृषि संशोधन ,शिक्षण आणि विस्तारामध्ये धोरण , सहकार्य याविषयी तसेच भारतामधील 71कृषि विद्याीठाचे ,730 कृषि विज्ञान केंद्र,04 डिम्ड विद्यापीठे , 111 ICAR संस्था , इत्यादी महत्वपूर्ण ICAR, नवी दिल्ली अंतर्गत कार्याचा उजाळा दिली .
प्रगतिशील शतकरी श्री हेमंत शेदरे आणि श्री चहांदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. व्हि . जी . नागदेवते यांनी कृषि विद्यापीठ यंत्रणा ,कार्य ,संशोधन आणि खरीप हंगामातील पिकांचे योग्य नियोजन विविध सखोल मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी ,महिला शेतकरी ,कृषि महाविद्यालय नागपूर येथी RAWE चे विदयार्थी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.