कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही तर्फे ‘गरीब कल्याण सम्मेलन’ संपन्न

दि. ३१ मे २०२२ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ, कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपुर तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर “गरीब कल्याण सम्मेलन” कार्यक्रमाचे आयोजन, तहसिल कार्यालय सिंदेवाही येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये मा. पंतप्रधान. भारत सरकार, श्री. नरेंद्र मोदी यांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी आभासी पद्धतीने थेट सुसंवाद साधून केंद्रशसनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांनसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशातील शिमला येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनाबाबत विविध राज्याच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून आठ वर्षाच्या प्रगतीचा लेखाजोखा सर्व देशवासीयासमोर मांडला. योजना जसे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पि. एम. किसान सन्मान निधी जनधन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, वन नेशन वन राशन, जल जिवन मिशन, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते किसान सम्मान निधीच्या 11 व्या हप्ताच्या 21 हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डिबीटी दवारे थेट जमा करण्यात आली
कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक, मा. श्री. जी. जे. जगदाळे, तहसिलदार, ता. सिदेवाही,      जि. चंद्रपुर तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून श्री. भाऊसाहेब ब-हाटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपुर हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. आर.जे. मनोहरे, उपसंचालक, कृषि विभाग चंद्रपुर, प्रा. जी.बी. गणवीर, सहायक प्राध्यापक, कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही, डॉ.  शालिनी लोंढे, पशुधन विकास अधिकारी, सिंदेवाही, श्री. ए.आर महाले, ता. कृषि अधिकारी, सिंदेवाही, श्रीमती आश्विनी घोडसे, ता.कृ.अ. सावली उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय. एन. सिडाम, शास्त्रज्ञ, कृषिके, सिंदेवाही यांनी गरीब किसान कल्याण सम्मेलन कार्यक्रमाची रूपरेषा, केंद्र सरकारच्या मागील आठ वर्षातील महत्वपुर्ण योजनांची माहिती देवुन कृषि विद्यापिठ विकसीत केलेल्या विविध पिकाचे तंत्रज्ञान शेतक-यांनी आत्मसात करावे असे सुचविले आणि खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या लागवड तंत्रज्ञान पेरीव धान पध्दत याबाबत मार्गदर्शन केले.      डॉ. सोनाली लोखंडे शास्त्रज्ञ, उदयानविद्या खरीप पिकातील भरडधान्याचे पोषण आहारातील महत्व विशयी सखोल मार्गदर्शन केले. प्रा. गणविर यांनी भाजीपाला रोपवाटीका यावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. शालिनी लोंढे यांनी पुशुधनमधील लसीकरणाची माहिती दिली. उदघाटनीय संभाषणात श्री. जी. जे. जगदाळे, तहसिलदार यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा  दिल्या. अध्यक्षीय मार्गदर्शनात मा. भाऊसाहेब ब-हाटे यांनी बिजप्रक्रियेचे महत्व व कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच मुल्यवर्धीत पदार्थाचे महत्व सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही तर्फे भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये विभागीय कृषि संशोधन केंद्र सिंदेवाही येथील डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला विकसीत धान पिकाच्या विविध वानाचे, उमेद सिंदेवाही यांचेमार्फत लावण्यात आलेल्या मुल्यवर्धीत पदार्थाचा आणि विविध यांत्रिकीकरणाचे यंत्र प्रदर्शनीमध्ये शेतक-यांसाठी आयोजीत करण्यात आले. तसेच खरीपपुर्व हंगाम नियोजन कार्यशाळा घेवुन उजाळा दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. सोनाली लोखंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. एन. डी. बारसागडे, श्री. एस. एस. इंबोळे, श्री. एन. श्री. चव्हाण, श्री. एस. एन. पवार, आणि कैलास कामडी यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला चंद्रपुर जिल्हयातील शेतकरी महिला शेतकरी ग्रामीण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *