कृषि विज्ञान केंद्र,सिंदेवाही तर्फे मा. संचालक,अटारी, पुणे अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान(NFSM) या योजनेअंतर्गत राबविण्यात येणारे खरीप हंगाम कडधान्य पिकांमध्ये तूर या पिकाचे समूह प्रथम रेषीय प्रात्यक्षिके चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही या तालुक्यात ७५ शेतकरी लाभार्थ्यांच्या एकूण 30 हेक्टरवर प्रात्यक्षिके राबविण्यात आले.त्यामध्ये २५ एकर वर सलग तूर प्रात्यक्षिके आणि ५० एकर वर बांधावर लावण्यासाठी तूर या पिकाच्या बिडीएन-७१६ हे वाण आणि इतर नीविष्ठा शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करिता वाटप करण्यात आले. त्यानिमित्त शेतकऱ्यांना तूर पीक लागवड तंत्रज्ञान विषयी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे पें ढरी कोकेवाडा, मुरपार ता. सिंदेवाही येथे आयोजित करण्यात आले.शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजक व मार्गदर्शक डॉ.विजय एन. सिडाम, विषय विशेषज्ञ( विस्तार शिक्षण ) कृविके,सिंदेवाही यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासाठी देण्यात आलेली तूर या पिकाची बिडीएन-७१६ या वाणाविषयीचे लागवड तंत्रज्ञान तसेच तूर पिकांमध्ये बीज प्रक्रिया करताना पुढील बाबींचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा -त्यामध्ये रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रियेमध्ये प्रति किलो दोन ग्रॅम थायरम +२ ग्रॅम कार्बेन्डाझिम किवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा घेऊन बियाणास चोळावे.त्यामुळे मूळ कुजव्यासारखा रोगांचे नियंत्रण करता येते.बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रियेनंतर पेरणीपूर्वी १० ते १५ किलो बियाण्याला २५० ग्रॅम रायझोबियम या जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया गुडाच्या थंड द्रावणातून हलक्या हाताने चोळावे आणि बियाणे सावलीत वाळून लगेच पेरणी करावी.बीज प्रक्रिया याविषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करून बीज प्रक्रियाचे प्रत्यक्ष प्राप्त करून दाखवले व शेतकऱ्यांना आवाहन केले की तुरीचे बियाणे पसरणारे विविध रोग टाळण्यासाठी तसेच रोपे जोमदार वाढ होण्यासाठी बीज प्रक्रिया नक्कीच करावे असे सुचविले तसेच कडधान्य पिकाच्या आहारातील महत्त्व याविषयी माहिती दिली. खरीप हंगाम या पिकाचे लागवड तंत्रज्ञानाचा वापर करून कडधान्य पिकांमधील उत्पन्न वाढवावे असे आवाहन करून शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात विकास घडवून आणावा अशी अपेक्षा व्यक्त केली.सदर प्रशिक्षणामध्ये श्री विश्वनाथ नारायण कुलथे कृषी सहायक पेंढरी आणि कैलास कांबळे यांचे मुलाचे सहकार्य लाभले सदर प्रात्यक्षिके डॉ. वि.जी.नागदेवते,कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र शिंदेवाई यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.